#अ‍ॅपद्वारे कर्ज फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने केली कार्यकारी गटाची स्थापना

 #अ‍ॅपद्वारे कर्ज फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने केली कार्यकारी गटाची स्थापना

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशभरातील अनेक शहरांमध्ये मोबाइल अ‍ॅप्सद्वारे कर्ज दिल्याची आणि नंतर फसवणूक झाल्याची प्रकरणे आढळल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 13 जानेवारीला एका कार्यकारी गटाची स्थापना केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि मोबाइल अ‍ॅप्सद्वारे कर्ज देण्यासह डिजिटल कर्जाचा अभ्यास करण्यासाठी एक कार्यकारी गट स्थापन करण्यात आला आहे. हा गट कर्ज देण्याच्या प्रक्रियेची तपासणी करेल आणि त्यावर नियंत्रण कसे आणता येईल या संदर्भात आपले मत देईल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेचा कार्यकारी गट डिजिटल कर्ज (अ‍ॅप लोन) देण्याच्या घटनांच्या सर्व पैलुंचा अभ्यास करेल जेणेकरुन त्याचे योग्य नियमन केले जाऊ शकेल. रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की वित्तीय क्षेत्रात डिजिटल व्यवहार वाढविणे हे एक चांगले पाऊल आहे. परंतु अनेकदा डिजिटल व्यवहाराशी संबंधित काही नकारात्मक जोखीम जोडलेल्या असतात. रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की अॅप आधारित कर्जावर नजर ठेवण्यासाठी आणि डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि ग्राहक सुरक्षेची खात्री करुन केंद्रीय बँक नव्या डिजिटील व्यवहारांचे समर्थन करते.
गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी अॅपद्वारे तात्काळ कर्ज प्रकरणात फसवणूक झाल्याची प्रकरणे आढळली आहेत. ज्यावर लगाम घालण्याची मागणी केली जात आहे. अनेक कंपन्या लोकांना घरबसल्या केवळ आधार कार्ड आणि पॅन क्रमांकाच्या मदतीने छोटी छोटी कर्ज देत आहेत. त्याच्या आडून फसवणुकीचे प्रकार आढळून येत आहेत. अशा कर्जांचे व्याज देखील खूप जास्त असते. देशातील सर्वात मोठी बँक-एसबीआयनेही ग्राहकांना अशी फसवणूक टाळण्यासाठी इशारा दिला आहे. त्याआधी रिझर्व्ह बँकेने देखील लोकांना इशारा दिला होता.
Tag-App Loan/RBI/Working Group
PL/KA/PL/14 JAN 2021

mmc

Related post