या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
आंध्र प्रदेशमध्ये 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 13 मे रोजी मतदान होणार आहे. अरुणाचल 20 मार्च अधिसूचना, 19 एप्रिल रोजी मतदान. सिक्कीम 19 मार्चला अधिसूचना, 20 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ओडिशात दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्याची अधिसूचना 29 एप्रिलला तर दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना 7 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. 25 मे आणि 1 जून रोजी मतदान होणार आहे.
याशिवाय गुजरातमधील 5, यूपीच्या 4, हरियाणा, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या प्रत्येकी 1 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच 4 जून रोजी सर्व राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
SL/ML/SL
16 March 2024