संतप्त मराठा आंदोलकांनी पेटवली एसटीची बस …

 संतप्त मराठा आंदोलकांनी पेटवली एसटीची बस …

जालना, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाज आक्रमक झाला असून अंबड तालुक्यातील तीर्थपुरी येथे मराठा आंदोलकांनी एसटी बसला आपलं लक्ष करत एसटी बस पेटवली.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर जालना जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी झालेले रास्ता रोको करण्यात आले. काल दुपारनंतर मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेधडक आरोपांच्या फैरी झाडून ते त्यांच्या मुंबईतील बंगल्यावर जाण्यासाठी निघाले आहेत .

त्या पार्श्वभूमीवर बीड- सोलापूर- जालना या महामार्गावर तसेच अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज जमा होण्याची शक्यता आहे, या संदर्भात जालनाचे जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी सोमवार म्हणजे आज मध्यरात्री एक वाजल्यापासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे. Angry Maratha protesters set ST bus on fire…

ML/KA/PGB
26 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *