अनंत अंबानी लालबागच्या राजाचा कारभार सांभाळणार: मंडळाच्या महत्त्वाच्या पदावर निवड
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील प्रतिष्ठित लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या महत्त्वाच्या पदावर अनंत अंबानी यांची निवड करण्यात आली आहे. या पवित्र आणि ऐतिहासिक गणेश मंडळाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी अंबानी घराण्यातील या तरुण उद्योजकावर सोपवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या वेळी लाखो भक्तगण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात, आणि आता अनंत अंबानी मंडळाच्या निर्णय प्रक्रियेचा भाग बनणार आहेत. त्यांच्या या निवडीमुळे मंडळाच्या कामकाजात नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लालबागचा राजा हा देशभरात प्रसिद्ध असलेला गणेशोत्सव आहे, आणि त्यात अंबानी कुटुंबाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत होण्याची शक्यता आहे..
ML/ML/PGB
4 Sep 2024