अमृता फडणवीसांचं नवीन गाणं श्रोत्यांच्या भेटीला

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी गायिका अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या हटके व्हिडिओ, पेहराव आणि प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतात. आता त्यांचं नवं गाणं श्रोत्यांच्या भेटीला आलं आहे. तुम्हे आईने की जरुरत नही, हे त्यांचं नवीन गाणं त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरल आहे. अमृता यांनी सोशल मीडियावर त्या गाण्याची लिंक शेयर करुन चाहत्यांना नवं गाणं ऐकण्याचं आवाहन केलं आहे.
यापूर्वी देखील अमृताजींच्या वेगवेगळ्या गाण्यांना प्रेक्षकांचा, चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. नवरात्री, गणेशोत्सवच्या निमित्तानं त्यांनी गायलेल्या गाण्यांना श्रोत्यांनी उस्फुर्त दाद दिली होती.
आता त्यांचे तुम्हे आईने की जरुरत नही या गाण्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चाही होत आहे.
SL/KA/SL
9 Dec. 2023