अमरावती जिल्ह्यात BBF तंत्रज्ञान पद्धतीने तूर,सोयाबीनची पेरणी

 अमरावती जिल्ह्यात BBF तंत्रज्ञान पद्धतीने तूर,सोयाबीनची पेरणी

अमरावती, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यातील Amravati district ग्रामीण भागात चांगला पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे.मात्र यावर्षी काही गावातील शेतकरी पारंपरिक पेरणी पद्धतीला फाटा देत बीबीएफ म्हणजेच (Broad bed furrow) रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन व तुरीची पेरणी करत आहेत.

कृषी विभाग अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नवीन तंत्रज्ञान आधारित पेरणी पद्धतीचं प्रात्यक्षिक देवून शेतात पेरणीसाठी मार्गदर्शन करत आहेत.पाऊस जास्त झाल्यावर शेतातून पाणी वाहून जाऊ नये म्हणून उताराला आडवी पेरणी करावी, अशा सूचना शेतकऱ्यांना कृषी तज्ञांकडून दिल्या जात होत्या, Such instructions were being given to the farmers by the agricultural experts काही प्रमाणात शेतकरी याचा अवलंब करत होते.

याचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याने उत्पादनात घट होत नसल्याचे निदर्शनास आले. परंतु आता जलस्थानी मृदसंधारण व्हावे,आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडावी यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी सोयाबीन व तूर पेरणी बिबीएफ पद्धतीचा अवलंब करावा , यासाठी जिल्ह्या मध्ये शेतात जाऊन प्रात्यक्षिक दिल्या जात असून प्रत्यक्षात पेरणी साठी मार्गदर्शनही करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या या नवीन पेरणी पद्धतीला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या रुंद सरी वरंबा (bbf) पद्धतीने पेरणी केल्यास एकरी 8 किलो बियाण्याची बचत होते, मूलस्थानी जलसंधारण मृदसंधारण, तसेच पावसातील खंड आणि अतिपावसाने पिकांचे संरक्षण होऊन एकरी 25 टक्के उत्पादनात वाढ होते. सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकर्‍यांनी बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी नीता कवाने यांनी सांगितले.

ML/KA/PGB

22 Jun 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *