बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरणासाठी अमिताभ आणि आशा भोसलें
मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात येत्या २३ तारखेला बसवण्यात येणार आहे , त्यासाठी प्रख्यात सिने अभिनेते अमिताभ बच्चन, पार्श्वगायिका आशा भोसले यांना विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमात व्यासपीठावर स्थान देण्यात येणार असून ठाकरे हे निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमाला उपस्थित राहतील का याची उत्सुकता असणार आहे.
राज्यात सत्ता पालट होऊन शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने संधी मिळेल तेथे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची कोंडी करण्याचे प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतला आणि तसे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले होते.Amitabh and Asha Bhosla arrive for the unveiling of Balasaheb Thackeray’s oil painting
त्यांच्या पत्रानुसार बाळासाहेबांचे तैलचित्र मध्यवर्ती सभागृहात लावण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात जाहीर केले.
त्यानुसार येत्या २३ जानेवारीला हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे त्याच्या पूर्वतयारीसाठी विधासभा अध्यक्षांनी आज एक बैठक घेतली. त्यात मध्यवर्ती सभागृहात व्यासपीठा समोरील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शेजारील रिकाम्या जागेवर बाळासाहेबांचे हे तैलचित्र लावण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी आमदार , खासदार , माध्यमांचे प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार असून येणारी गर्दी लक्षात घेता विधान भवन परिसरात मोठे स्क्रीन लावून त्यावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
ML/KA/PGB
06 Jan. 2023