देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात लवकरच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात लवकरच इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी आयआयटी मद्रासच्या इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट स्टार्टअप ईप्लेन कंपनीने एक अब्ज डॉलरचा (जवळपास ८६ अब्ज रुपये) करार केला आहे. त्याअंतर्गत भारतातील आघाडीची हवाई रुग्णवाहिका कंपनी ‘आयसीएटीटी’ला ७८८ एअर ॲम्ब्युलन्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मदत होणार आहे.
ML/ML/PGB 19 Feb 2025