अखिल भारतीय साहित्य परिषद,महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण दवणे

 अखिल भारतीय साहित्य परिषद,महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रविण दवणे

रत्नागिरी, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अखिल भारतीय साहित्य परिषद या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या बहुभाषक साहित्य संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाची वर्ष २०२३-२४ ची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली असून ज्येष्ठ साहित्यिक प्रविण दवणे यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.

कार्याध्यक्ष म्हणून ठाण्याचे डॉ नरेंद्र पाठक यांची तर महामंत्री म्हणून डॉ बळीराम गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली आहे..

या कार्यकारिणीत विदर्भातून ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक आणि ऍड सचिन नारळे यांना संधी मिळाली आहे. अविनाश पाठक यांना उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले असून सचिन नारळे हे विदर्भ प्रांत प्रतिनिधी म्हणून निवडले गेले आहेत.उपाध्यक्ष म्हणून पाठक यांच्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक विसुभाऊ बापट यांचीही निवड करण्यात आली आहे..

कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी असे आहेत.
कार्यवाह : मोहन ढवळीकर.
संघटन मंत्री: नितीन केळकर.
प्रांत प्रतिनिधी :-
कोकण प्रांत:प्रविण देशमुख.
पश्चिम महाराष्ट्र प्रांत: शशिकांत घासकडवी.
देवगिरी प्रांत: प्रा.डॉ. पुरुषोत्तम पाटील.
विदर्भ प्रांत: सचिन नारळे.
समाज माध्यम प्रमुख:
निकिता भागवत.
संरक्षक: सुनील वारे.
निमंत्रित सदस्य: प्रमोद बापट.

रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथे झालेल्या साहित्य परिषदेच्या बैठकीत ही कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. या कार्यकारिणीचा कार्यकाळ एक वर्षाचा आहे..All India Sahitya Parishad

ML/KA/PGB
8 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *