मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अकृषीक विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या
परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या
आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३ पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित
करण्यात आल्या आहेत.
स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्राच्या
विविध विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. अकृषीक विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय तसेच महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने आज पासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
सदर आंदोलनामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्याने मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३ पासून स्थगित करण्यात आल्या आहेत. आजच्या मुंबई विद्यापीठाच्या १० परीक्षा सुरळीत पार पडल्या.All exams of Mumbai University postponed
II आज झालेल्या १० परीक्षा Il
सकाळचे सत्र : परीक्षा -२
१. एमए सत्र ४
२. एमए हिंदू स्टडीज
दुपारचे सत्र : परीक्षा – ८
१. एमएस्सी सत्र ४
२. एमकॉम सत्र २ (सिबीजीस)
३. एमकॉम सत्र २ (चॉईसबेस)
४. एलएलबी सत्र ३
५. एलएलबी / बीएलएस सत्र ३ (५
वर्षीय )
६. एमकॉम भाग १ (वार्षिक)
७. बी.व्होक. हेल्थ केअर सत्र ५
८. बी.व्होक. हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम
सत्र ५
ML/KA/PGB
2 Feb. 2023