आळंदीत अध्यात्मिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा

पुणे, दि. १९ :– महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते अध्यात्मिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा उद्या संपन्न होणार आहे. शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना आणि श्रीमंत माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा विशेष सोहळा दुपारी ४.०० वाजता, सदगुरु श्रीअमृतनाथ स्वामी महाराज संस्थान सभागृह, श्रीक्षेत्र आळंदी, पुणे येथे होणार आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या कार्याला मान्यता मिळावी, या उद्देशाने या सन्मान सोहळ्याचे मार्गदर्शन स्वीकारले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अध्यात्म, सेवा, साधना आणि संस्कृती या क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजात अध्यात्मिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या आणि लोकहितासाठी कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या कार्याचा गौरव या निमित्ताने केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजन अक्षय महाराज भोसले (प्रदेशाध्यक्ष, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना), विनिता माऊली सपनेस (प्रमुख, श्रीमंत माऊली प्रतिष्ठान) आणि श्री प्रभंजन दादा महातोले (सहअध्यक्ष, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.