अकोला जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार
अकोला, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिव्यांग सशक्तिकरण व दिव्यांगजनांसाठीच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमबजावणी केल्याची नोंद घेत केंद्र सरकारच्या वतीने अकोला जिल्हा परिषदेला 2021 राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते आहे.
आज जागतिक अपंगदिनी दिल्ली येथे देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. ही अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
तत्कालीन पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रयत्नाने जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात आले, ज्याला अकोला पॅटर्न म्हणून राज्यभरात ओळख मिळाली ,सर्वेक्षणापूर्वी जिल्हयातील दिव्यांगाची संख्या केवळ 7 हजार 309 एवढी होती मात्र घरोघरी जाऊन आशा स्वयंसेविका आरोग्यसेविका यांनी केलेल्या दिव्यांग सर्वेक्षणानंतर जिल्ह्यातील दिव्यांगांची संख्या 44 हजार 94 एवढी वाढली.
जिल्हा परिषदेने दिव्यांगासाठी राबवलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन 2021 चा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार अकोला जिल्हा परिषदेला जाहिर करण्यात आला आहे.
दिव्यांग सर्वेक्षणानंतर दिव्यांगाच्या आकडेवारीनुसार दिव्यांगांच्या विविध उपाय योजना राबवण्यासाठी या माध्यमातून मदत होणार आहे.
ML/KA/PGB
3 Dec .2022