अहमदाबादमध्ये कोसळले AIR India चे विमान, विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू

 अहमदाबादमध्ये कोसळले AIR India चे विमान,  विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू

अहमदाबाद, दि. १२ : येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि त्यात 242 प्रवासी होते. अत्यंत भीषण अपघातात विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एक प्रवासी आश्चर्यकारकपणे बचावला आहे. वृत्तसंस्था एएनआयने पोलिस आयुक्तांच्या हवाल्याने सांगितले की, विमानातील सीट क्रमांक ११-ए वर बसलेले भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे अपघातातून वाचले. त्यांचा व्हिडिओही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेक-ऑफ दरम्यान विमान विमानतळाच्या भिंतीवर आदळले आणि त्याला आग लागली. विमानतळ कॅम्पसला लागून असलेल्या एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ विमान कोसळले. अहमदाबाद विमानतळावरून दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी ह्या विमानानं लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हा अपघात घडला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील याच विमानातून प्रवास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अपघातस्थळावरून आतापर्यंत 100 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ज्या इमारतीवर विमान आदळले त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, ४५ डॉक्टर जखमी झाले आहेत.

विमानातील प्रवाशांचे तपशील

या अपघातग्रस्त विमानात एकूण 242 प्रवासी होते. यामध्ये 2 पायलट, 10 क्रू मेंबर्ससह 230 प्रवाशांचा समावेश होता. प्रवाशांमध्ये भारताच्या 169 भारतीय नागरिकांचा समावेश होता. तर 51 ब्रिटीश, 7 पोर्तूगीज, 1 कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. तसेच 2 नवजात बालक, 11 लहान मुलं या विमानातून प्रवास करत असल्याची माहिती आहे. या अपघातग्रस्त विमानातील संपूर्ण 230 प्रवाशांची यादी आता समोर आली आहे.

घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अपघातग्रस्त विमान एअर इंडियाचं आहे. बोईंग ड्रीमलायनर ७८७ विमान ११ वर्षे जुनं असल्याची माहिती समोर आलेली आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानानं उड्डाण केलं. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाला. अपघात होताच विमानानं पेट घेतला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. आग काही प्रमाणात नियंत्रणात आलेली आहे. अपघातात विमानाचा एक पंख तुटला आहे. तो विमानापासून वेगळा झाला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *