कृषी संजिवनी आजपासून सुरुवात
नागपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी संजिवनी मोहीम 25 जून ते 1 जुलै या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार It will be implemented across the state during this period असून या मोहिमेचा शुभारंभ नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शुभारंभ करण्यात आला.
नागपूर जिल्हयातील अमरावती रोडवरील धामना लिंगा ग्रामपंचायत येथे विभागीय कृषी सहसंचालक नागपूर रविंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. सप्ताहात प्रत्येक दिवशी महत्वाच्या तंत्रज्ञान व प्रशिक्षण यावर विशेष भर देवून प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कृषी संजिवनी मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.Such an appeal has been made by Collector R Vimala.
25 जून रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मुल्यसाखळी बळकटीकरण दिन, 26 जून रोजी पोष्टीक तृणधान्य दिवस, 27 जून महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस, 28 जून रोजी खत बचत दिन, 29 जून रोजी प्रगतशिल शेतकरी संवाद दिवस, 30 जून रोजी शेतीपूरक तंत्रज्ञान दिवस व 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे.
कृषी विभाग, जिल्हा परिषद,कृषी विद्यापीठ, विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ, कृषी संलग्न विभागाचे अधिकारी, कृषी मित्र मिळून या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करणार आहे. कृषी विद्यापीठाचे संशोधित तंत्रज्ञान,अद्यावत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून त्याचा अवलंब शेतकऱ्यांनी प्रभावीपणे करण्यासाठी सप्ताहात मोहीम स्वरुपात आयोजन करण्यात येणार आहे.
ब्लॉग स्पॉट blog spot या कार्यक्रमांदरम्यान कृषी विभागाच्या महत्वाच्या योजनांची माहिती krushivibhag.blogspot.com माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.ऑटो रिप्ले कृषी विषयक योजनांची माहिती व्हॉटस्ॲपवर मिळविण्यासाठी 918010550870 या क्रमांकावर कीवर्ड असा व्हॉटस्ॲप संदेश पाठवावा. ज्या योजनांची माहिती हवी आहे, त्या योजनेचा किवर्ड टाईप केला की, त्या योजनेची तत्काळ माहिती प्राप्त होईल. या ऑटो रिप्ले सुविधेचा सुध्दा मोहिमेच्या दरम्यान प्रचार प्रसार व माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
http//www.youtube.com/c/AgricultureDepartment.Gom हे कृषी विभागाचे यु-टयु चॅनेल आहे. या मोहिमेदरम्यान यु-टयु वरील शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांना दाखविण्यात येणार आहे.
ML/KA/PGB
25 Jun 2022