भारतात उमटले हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद, लखनौत हजारोंच्या संख्येने लोकं उतरली रस्त्यावर
हिजबुल्लाहचा मुख्य हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथं मोठ्या संख्येने विरोध करण्यात आला. छोट्या इमामबाड्यापासून मोठ्या इमामबाडाच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने लोक उतरले होते. इस्त्रायलनं २७ सप्टेंबरला केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये नसरल्लाह मारला गेला. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतरही लेबनानमध्ये दहशतवादी ठिकाणांवर इस्त्रायलानं हवाई हल्ले सुरूच ठेवले आहेत. लखनौमध्ये लोकांनी घरे, दुकांनावर काळे झेंडे फडकावले होते. हजारो लोकं मेणबत्ती, मोबाईल टॉर्च घेऊन रॅलीत सहभागी झाले होते.