निवडणुकीच्या निकालातील सुनामीनंतर बाजार (Stock Market) सावरला

 निवडणुकीच्या निकालातील सुनामीनंतर बाजार (Stock Market) सावरला

मुंबई, दि. ८ (जितेश सावंत) : Market rallied over 3% अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजाराने मागील आठवड्यातील तोटा पुसून टाकत 3 टक्क्यांहून अधिक वाढ घेतली. बाजाराची सुरुवात तुफान तेजीने झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार म्हणजेच मोदी 3.0 च्या शक्यतेने व्यवहार सुरू होताच छप्परफाड तेजी नोंदवली गेली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 3 वर्षातील एका दिवसातील सर्वाधिक वाढ झाली. सेन्सेक्सने तब्बल 2621 अंकानी उसळी घेतली.
During a volatile week, the market rallied over 3%, recovering from the previous week’s losses. Exit polls indicated a potential Modi 3.0, leading to record-breaking gains for Sensex and Nifty, with Sensex surging by as much as 2621 points.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सलग तिसऱ्यांदा महत्त्वपूर्ण विजय मिळण्याची शक्यता वर्तवली गेल्याने दलाल स्ट्रीटने बहुतांश एक्झिट पोलच्या निकालाचा आनंद व्यक्त केला. सकारात्मक जागतिक बाजारपेठा, मान्सूनचे लवकर झालेले आगमन ,हायर जीएसटी कलेक्शन, आणि चांगल्याच जीडीपी डेटाचा अंदाज यामुळे या रॅलीत अजून भर पडली.

Biggest fall in history
परंतु हा आनंद जास्त काळ टिकला नाही .लोकसभा निवडणुकीच्या निकालातील भाजपाच्या पिछाडीमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारात त्सुनामी दिसली.भारतीय शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण झाली.सर्वात मोठी घसरण अदानी समूहाच्या समभागात झाली. सेन्सेक्स मध्ये 6000 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली. निर्देशांक 4 जून रोजी सुमारे 6 टक्क्यांनी घसरले,निर्देशांकांकरिता चार वर्षांतील त्यांचा सर्वात वाईट दिवस ठरला.
After the BJP’s loss in the Lok Sabha election, the Indian stock market experienced its biggest fall in history. Sensex dropped by over 6000 points, marking a nearly 6 percent decline on June 4.

बुधवारी बाजार निवडणूक निकालांच्या धक्क्यातून सावरला आणि सेन्सेक्सने 2303 अंकांची उसळी घेतली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होण्याच्या शक्यतेमुळे बाजार सावरला. सेन्सेक्सने 75 हजाराचा टप्पा ओलांडला.

RahulGandhi demands JPC, calls it is a scam
6 जून रोजी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी शेअर बाजारातील सर्वात मोठ्या घाेटाळ्याचा आरोप केला. मोदी , अमित शाह यांनी शेअर खरेदीचा सल्ला दिला. नंतर एक्झिट पोलच्या मदतीने बाजारात मोठा घोटाळा झाला. यात गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटी बुडाले.असे ते म्हणाले. गृहमंत्र्यांनी ४ जूनला निकाल लागेल तेव्हा बाजार विक्रम करेल. तसेच मोदींनीही रेकॉर्डब्रेक तेजीचा दावा करत शेअर खरेदीचे आवाहन केले होते खरे तर २२० जागा मिळत असल्याचे भाजपला सर्व्हेत कळले होते. पण एक्झिट पोलमध्ये आकडे फुगवले. त्यामुळे ३ जूनला मार्केट तेजीत आले. पण ४ जूनला कोसळले. या प्रकाराची ‘जेपीसी’ चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी राहुल यांनी केली.
On June 6, the leader of the Congress party, Rahul Gandhi, alleged that the significant stock market loss was due to advice from Modi and Amit Shah to buy shares. Subsequently, following the release of exit polls, a major scam occurred in the market. Rahul called for a ‘JPC’ investigation to be conducted into this matter.

Market rebounded strongly, and went to all-time high
आठवड्याच्या शेवट उत्तम झाला. सेन्सेक्सने आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठला. NDA सरकारची स्थापना, देशांतर्गत आवक आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या एमपीसी बैठकीनंतर विकास दरात जोरदार वाढ होण्याच्या अंदाजांमुळे बाजार वधारला. RBI ने सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज 7 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांपर्यंत वाढवल्यामुळे बाजार वाढला.
Market rebounded strongly, and went to all-time high after RBI raised the growth forecast for FY25. The investor sentiments also get uplifted after the BJP-led NDA is going to form a new government under Modi for the third time in a row.

गुंतवणूकदारांचे लक्ष रविवारी होणाऱ्या पंतप्रधानांचा शपथविधी, 10 तारखेचा AMFI DATA ,12 तारखेचा Fomc rate decision, 12 तारखेचा CPI data ,तसेच 13 तारखेला Italy येथे सुरु होणाऱ्या G7 7 summit कडे असेल.

( लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत )

jiteshsawant33@gmail.com

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *