३० वर्षानंतर शनिदेवांचा कुंभ राशीत होणार प्रवेश

 ३० वर्षानंतर शनिदेवांचा कुंभ राशीत होणार प्रवेश

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  २०२३ च्या वर्षारंभी, १७ जानेवारी रोजी शनीदेव अडीच वर्षांनी मकर राशीतून कुंभ राशीत विराजमान होणार आहेत व २९ मार्च २०२५ पर्यंत ते तेथेच राहणार आहेत. शनिदेव दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतात व त्यांचे राशीचक्र साधारणतः ३० वर्षांत पूर्ण होते. शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे काही राशींचे भाग्य उजळेल तर काही राशीच्या लोकांच्या अडचणीत वाढ होताना दिसेल.शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच कुंभ, मकर, मीन राशीच्या लोकांची साडेसाती सुरु राहील.

१७ जानेवारी पासून शनी देव भारताच्या धनस्थानात व महाराष्ट्राच्या तृतीय स्थानात विराजमान होतील.

शनी देव हे सर्व ग्रहांचा राजा म्हणजेच रवी व छायादेवी यांचा पुत्र व यमदेवांचे बंधू असून मकर व कुंभ या राशींचा स्वामी आहे.शनी देव न्यायाधीश व कर्तव्यकठोरही आहे पण तो प्रेमळ देखील आहे.शनी म्हणजे विलंब.शनी खूप भोगावयास लावतो मगच फळ देतो.शनीला खोटी स्तुति आवडत नाही. शनीची गुरुत्वाकर्षण शक्ती हि पृथ्वीपेक्षा ९५ पटीने जास्त आहे असे मानतात याच गुरुत्व बळामुळे आपले चांगले वाईट विचार चुंबकीय शक्तीने शनी देवापर्यंत पोहचतात व त्या विचारांनुसार त्याचे परिणाम लवकरच आपल्याला दिसतात. म्हणूनच आपले विचार नेहमीच चांगले / सकारात्मक असावेत.कुठलाही अहंकारीपणा ,गर्विष्ठपणा हा शनिमहाराजांना चालत नाही.व ते अश्या व्यक्तींना दंड देतात. म्हणूनच आपण कायम नम्र राहावे. शनी देव हे, जो मनुष्य ह्या व्यवहारी जगात सुद्धा आपला चांगुलपणा टिकवून ठेवतो व न्यायाने वागतो चांगली कर्मे करतो अश्या व्यक्तींवर कायम प्रसन्न असतात. शनीची गती ही अतिशय मंद असते.शनी हा माणसाचा संयम तपासतो.तूळ हि शनीची उच्च रास आहे व मेष हि त्याची नीच रास आहे.

शनी या ग्रहाचा प्रभाव प्रामुख्याने शेतकरी,कष्टकरी,दुष्काळ,देशातील वृद्ध माणसे, जनतेत असंतोष-विद्रोह,राष्ट्राचीनिर्यात,गुप्तशत्रू,न्यायाधीश,न्यायप्रणाली,,मेटल,ऑटो,मायनिंगसेक्टर,कृषी,कोळसा,पेट्रोल,तेल,दुर्घटना,अपघात, आर्किटेक्ट,मोठया इमारतीच्या बांधकामात सहभागी असलेले मजूर तसेच सांधे व कमरेच्या वेदना यावरती दिसतो.
शनि मंत्र –
नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम |
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम |

जितेश सावंत
के. पी. विशारद ,नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant)
jiteshsawant33@gmail.com

 

ML/KA/PGB
5 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *