२६ तासांनंतर पश्र्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

पालघर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर रेल्वे स्थानकात काल संध्याकाळी मालगाडीच्या झालेल्या अपघातानंतर आता पावणे सात वाजताच्या दरम्यान जवळपास २६ तासांनंतर विरारहून पहिली लोकल पालघरच्या प्लेटफॉर्म क्रमांक 1 वरून डहाणूकडे रवाना करण्यात आली. त्यानंतर डहाणूहून विरार कडे जाणारी पहिली लोकल पालघर रेल्वे स्टेशनच्या प्लेटफॉर्म क्रमांक 2 वरून विरारकडे रवाना करण्यात आली. काल संध्याकाळ पासून पच्छिम रेल्वेची विरार ते डहाणू दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. सध्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरून धीम्या गतीने गाड्या सोडण्यात येत आहेत. After 26 hours, the traffic of Western Railway gradually returned to normal
ML/ML/PGB
29 May 2024