अभिनेत्री राखी सावंतला अटक
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याच्या आरोपी वरून अभिनेत्री राखी सावंतला मुंबईच्या अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. मध्यतरी शरलीन चोप्राचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ राखीनं पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यावरून आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं म्हणून राखीविरोधात शरलीन चोप्राने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे.
काल राखी सावंतनं यासंदर्बात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला’, अशी माहिती शरलीन चोप्रानं ट्वीटमध्ये दिली आहे.Actress Rakhi Sawant arrested राखी सावंत आज दुपारी पती आदिल दुर्रानीसोबत तिच्या डान्स अकादमीचं उद्घाटन करणार होती. पण याआधीच तिला शर्लिन चोप्रा प्रकरणात पोलिसांनी अटक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
SW/KA/PGB
19 Jan. 2023