मुंबईतील आचार्य मराठे विद्यालयात हिजाब नंतर आता जीन्स – टी शर्ट, जर्सी घालण्यावर बंदी
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील आचार्य मराठे विद्यालयात हिजाब नंतर आता जीन्स – टी शर्ट, जर्सी घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोमवार पासून हा निर्णय घेण्यात आला असून जीन्स टी शर्ट घालून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना माघारी पाठवण्यात आले. तसेच कॉलेजने एक पत्रक काढत विद्यार्थ्यांसाठी ड्रोस कोडबाबत सूचना दिल्या आहेत.महाविद्यालय प्रशासनाने नवा ड्रेसकोड सुरू केला आहे. या नव्या ड्रेस कोडची नियमावली आहे. त्यानुसार२७ जूनपासून त्याच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे.
महाविद्यालयाच्या आवारात कोणता पोशाख घालावा याबाबात नियमावलीत मार्गदर्शन केले गेले आहे. मुलासांसाठी कोणताही फॉर्मल हाफ शर्ट, फुल शर्ट आणि पँट, तर मुलींसाठी कोणताही भारतीय पोशाख घालण्यास परवानगी आहे. मात्र, धर्म दर्शवणारा पोशाख कुणी परिधान करु नये, असे नियमावलीत म्हटले आहे. Acharya Marathe Vidyalaya in Mumbai bans jeans, t-shirts, jerseys after hijab
ML/ML/PGB
2 July 2024