हातगाडा ओढण्याची अनोखी स्पर्धा ….

 हातगाडा ओढण्याची अनोखी स्पर्धा ….

सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगलीत पहिल्यांदाच हातगाडा ओढण्याची अनोखी स्पर्धा पार पडली. यामध्ये 12 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. वज्रदेही पै. हरिनाना पवार व बिजलीमल्ल पै. संभाजी पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त या स्पर्ध्येचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीच्या मारुती चौक ते झांसी चौक असा स्पर्ध्येचा मार्ग होता.

पहिल्यांदाच ही अनोखी स्पर्धा होत असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या हातगाडा स्पर्ध्येत गुंडीप्रेमी कोळे सांगोला यांनी प्रथम क्रमांक तर काजळी प्रेमी ग्रुप कवठेमहांकाळ यांनी द्वितीय आणि हनुमान मित्र मंडळ वसगडे यांनी तुतीय क्रमांक पटकावला. याप्रसंगी युवानेते पृथ्वीराज पवार, रवींद्र वादवणे, शिवराज बोळाज, रेखा पाटील, शलाका पवार आदी उपस्थित होते.A unique handcart pulling competition ….

ML/KA/PGB
19 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *