MMC ची यशस्वी चार वर्षे

 MMC ची यशस्वी चार वर्षे

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्रिय MMC वाचकहो!

‘शब्द वाटू धन, जनलोका’, या ब्रीदवाक्यासह चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आपल्या MMC News Network ला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. माहिती विस्फोटाच्या या काळात तुमच्यापर्यंत नेमकी, विश्वासार्ह आणि सर्वंकष बातमी पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न या काळात सातत्याने करत आहोत.

तासातासाला ब्रेकींग न्यूज आणि सनसनाटी बातम्या देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या गर्दीत तुम्हाला विविध क्षेत्रांबाबत अपटेड ठेवणाऱ्या मोजक्या पण आवश्यक बातम्या देणे हे आमचे वेगळेपण आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून जपले आहे. बेवसाईटबरोबरच फेसबुक,इन्स्टाग्राम,युट्युब अशा सर्वच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आम्ही आमच्या सुज्ञ वाचकांपर्यंत पोहोचत आहोत. गेल्या आठवड्यापर्यंतची ही एकूण संख्या ८१ लाख ६८ हजार १९० इतकी होती आणि ती सतत वाढत आहे.

दररोज शेकडो बातम्यांचा वर्षाव करणाऱ्या ऑनलाईन प्लॅटफ़ॉर्मच्या गर्दीत MMC News Network ने आपले हे वेगळेपण टिकवून,स्वतःला सिद्ध केले हे आम्ही आपल्या संपादक,वार्ताहर आणि तांत्रिक टीमचे यश समजतो. मात्र या साऱ्यात सर्वांत महत्वाचे म्हणजे, “वाचकहो तुम्ही”! तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे, पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळेच MMC ने हा चार वर्षांचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. याकाळात सर्वांप्रमाणेच आम्हीही कोरोनाच्या संकटातून गेले, परंतु तेव्हा देखील अखंड कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळत राहीली ती केवळ तुमच्या सकारात्मक पाठींब्यामुळे.

आपल्या स्थापनेपासूनच MMC News Network ने जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींसह देशातील, राज्यातील ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत.राजकारण,
समाजकारण,अर्थकारण,
शिक्षण, कृषी, क्रीडा,
आरोग्य, महिला, मनोरंजन, करिअर आणि अशा विविध विषयांतील देश व जगभरातील सर्व प्रमुख घटना कव्हर करून बातम्यांचा एक विश्वासार्ह स्त्रोत म्हणून आम्ही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. हे करत असताना आमच्या वृत्तसंस्थेने नेहमीच निष्पक्ष आणि निःपक्षपाती बातम्या सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.

मोठ्या वृत्तपत्रांमध्ये शहरी बातम्यांच्या गर्दीत तळागाळातील सामान्य वाचकाच्या उपयोगाची आणि जिव्हाळ्याची बातमी कोठेतरी हरवून बसते. MMC चे वैशिष्ट्य म्हणजे देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींबरोबर आम्ही आपल्या राज्यातील सर्वसामान्यांचे विषयही प्रकर्षाने मांडतो. MMC तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील बातम्यांचे प्रतिनिधित्व दिसेल. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ या दुर्गम जिल्ह्यातील बातम्याही आम्ही प्राधान्याचे प्रसिद्ध करतो आणि याच कारणामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांचे प्रेम आम्हाला लाभत आहे. शहरी वाचकांबरोबरच ग्रामिण वाचकांनीही MMC ला पसंती दर्शवली आहे.

आणखी एक अतिशय महत्त्वाचे आहे, MMC ने आता YouTube वरही पदार्पण केले आहे. प्रख्यात माध्यमतज्ज्ञ नीतीन केळकर दर आठवड्याला ‘वर्तमान’ या MMC निर्मित व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला त्या त्या आठवड्यातील विशेष घटनेचे त्यांच्या खास शैलीमध्ये खुमासदार विश्लेषण करतात. हे व्हिडीओ देखील हळूहळू लोकप्रिय होत आहेत.A successful four years of MMC

Trimitiy Studio या पुणेस्थित प्रसिद्ध PR कंपनीच्या उत्तम तांत्रिक सल्ला आणि सहकार्यामुळे तुमच्या पर्यंत तत्परतेने पोहोचण्यास आम्हाला मोठी मदत होते. या वर्धापनदिनानिमित्त त्यांचेही आभार.

तुमचे प्रेम आणि लोभ आहेच, भविष्यातील वाटचालीत MMC आणि सुज्ञ वाचकांमधील हा स्नेहबंध असाच टिकून राहो आणि वृद्धींगत होवो हीच सदिच्छा !

आपलेच
Team MMC

ML/KA/PGB
19 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *