भारतीय वंशाची व्यक्ती करणार ‘मून टू मार्स’ मोहिमेचे नेतृत्व
वॉशिग्टन, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नासाने ‘मून टू मार्स’ या मिशनचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय यांची निवड केली आहे. चंद्र आणि मंगळावरील मानवी मिशन्ससाठीचे नियोजन आणि डिझाइन पूर्ण करण्यासाठी ते काम करणार आहेत. नासाने नवीन कार्यालय सुरू केलं असून त्याला मून टू मार्स प्रोग्राम ऑफिस असं नाव देण्यात आलं आहे. हे कार्यालय चंद्र आणि मंगळावरील मानवी मिशन्ससाठीचे नियोजन, डिझाइन आणि पूर्ण करण्यासाठी मोहिमा तयार करेल. अमेरिकन स्पेस एजन्सी(NASA) ने एका भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
अमित क्षत्रिय नासाच्या सर्वात मोठ्या आर्टेमिस मिशनचे आणि मानवांना मंगळावर नेण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. या आधी अमित कॉमन एक्सप्लोरेशन सिस्टम्स डेव्हलपमेंट डिव्हीजमध्ये डिप्टी असोशिएट अॅडमिनिस्ट्रेटर होते. या पदावर असतानाच त्यांनी नासाचे सर्वात मोठे मिशन अर्टेमिस च्या स्पेस लाँच सिस्टिम म्हणजेच सर्वात मोठे रॉकेट ओरियन स्पेसक्राफ्ट आणि एक्सप्लोरेशन ग्राउंड सिस्टम्स प्रोग्राम्स बनवले होते.
मून टू मार्स प्रोग्राम ऑफिसचे कार्यालय एक्सप्लोरेशन सिस्टम्स डेव्हलपमेंट मिशन डायरेक्टोरेट मध्ये असेल. अमित नासाचे असोशिएटेड अॅडमिनिस्ट्रेटर जिम फ्री यांना रिपोर्ट करतील.नासाचे प्रमुख आणि प्रशासक बिल नेल्सन यांनी सांगितले की, मून टू मार्स प्रोग्राम ऑफिस चंद्रावरच्या मोहिमेवर आणि मानवाला मंगळावर उतरवण्याच्या मिशनवर काम करतील.
SL/KA/SL
31 March 2023