बाजाराचा नवीन विक्रमी उच्चांक. निफ्टीने प्रथमच केली 20 हजाराची पातळी पार

मुंबई, दि. 16 (जितेश सावंत): भारतीय शेअर बाजारातील तेजीचा कल गेल्या आठवड्यात कायम राहताना दिसला. काही प्रमाणात चढ उतार वगळता बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टीने प्रथमच 20 हजार अंकांची पातळी गाठली तर सेन्सेक्सने पुन्हा एकदा 67 हजारांची पातळी ओलांडली, 2007 नंतर सेन्सेक्समधील सर्वात मोठी वाढ ठरली. गेल्या 11 सत्रांमध्ये सेन्सेक्स 4.63 टक्क्यांनी वाढला.
देश-विदेशातून येणाऱ्या सकारात्मक बातम्यांचा बाजाराला पाठिंबा मिळाला आणि मान्सूनचा पाऊस कमी होऊनही विश्लेषकांनी चिंता जाहीर केली नसल्याने बाजाराला गती मिळाली. देशांतर्गत गुंतवणूक
दारांकडून सुरू असलेली खरेदी, पुढील आठवड्यात होणार्या धोरण बैठकीत फेड दर वाढवणार नसल्याच्या अपेक्षेने एफआयआयची कमी झालेली विक्री,सकारात्मक मॅक्रो डेटा या पार्श्वभूमीवर 15 सप्टेंबर रोजी संपलेल्या सलग तिसऱ्या आठवड्यात मार्केटने विजयी घोडदौड सुरू ठेवली. परंतु रुपया मात्र खालीच आहे
फेडरल रिझव्र्हच्या धोरण बैठकीपूर्वी शुक्रवारी अमेरिकन बाजार घसरले.
डाऊ जोन्स जवळपास 300 अंकांनी खाली आला, Dow sheds nearly 300 points.
मान्सून आणि इक्विटी बाजारातील परतावा (relationship between monsoon and equity market returns)
गेल्या दशकात, सरासरीपेक्षा कमी पावसाच्या सात घटना घडल्या आहेत, निफ्टी 500 ने यापैकी बहुतेक वेळा सकारात्मक परतावा दिला आहे, ज्यामध्ये दुहेरी-अंकी परताव्याच्या काही उदाहरणांचा समावेश आहे. तथापी, अशीही प्रकरणे आहेत की 2019 मध्ये, जेव्हा ‘सामान्यतेपेक्षा जास्त’ मान्सून पाऊस पडला होता, परंतू निफ्टी 500 ने 4.7 टक्के नकारात्मक परतावा नोंदवला.
Technical view on nifty-.
मागील आठवड्यात बाजार मजबुतीने बंद झाला. शुक्रवारी निफ्टीने 20192 चा बंद भाव दिला.बाजार ओव्हर बॉट झोन मध्ये आहे. येणाऱ्या आठवड्यात निफ्टी साठी 20150-20120-20096 हे महत्वाचे सपोर्ट स्तर आहेत हे तोडल्यास निफ्टी 19944-19914-19890-19853 हे स्तर गाठेल.वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 20222 हा स्तर रेसिस्टन्स (resistance) ठरेल हा स्तर ओढल्यास निफ्टी नवीन विक्रम प्रस्थापित करेल निफ्टी 20400-20465 चे टप्पे गाठेल.
बाजाराचे लक्ष 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या Fomc meeting rate decision कडे असेल. भारतीय बाजार 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी निमित्त बंद राहतील.
निफ्टीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला, सेन्सेक्स 528 अंकांनी वर
भारतीय शेअर बाजारातील तेजीचा कल सोमवारी सलग सातव्या सत्रात कायम राहिला आणि निफ्टीने प्रथमच 20 हजार अंकांची पातळी गाठली तर सेन्सेक्सने पुन्हा एकदा 67 हजारांची पातळी ओलांडली.बाजाराला G20 समिटचे (G20 Summit 2023) यशस्वी आयोजन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि HDFC बँक मधील खरेदीमुळे पाठिंबा मिळाला. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे बाजारालाही गती मिळाली. शेवटच्या तासात, निफ्टी 50 निर्देशांकाने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आणि 20,000 चा टप्पा ओलांडला. तथापी, सेन्सेक्स 20 जुलै 2023 रोजी पोहोचलेल्या 67619.17 च्या विक्रमी उच्चांकापासून 492 अंक दूर राहिला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 528.17 अंकांनी वधारून 67,127.08 वर बंद झाला.
दुसरीकडे निफ्टीत 176.30 अंकांची वाढ होऊन निफ्टीने19,996.30 चा बंद दिला. Nifty ends near 20,000-mark, Sensex zooms 528 pts . विक्रमी पातळी गाठल्यानंतर निफ्टीमध्ये थोडीशी घसरण होऊन
मंगळवारी गॅप-अप स्टार्टनंतर, बाजार दबावाखाली आला आणि निफ्टी 20,000 अंकाच्या आसपास घिरट्या घालत राहिला. बाजारात जोरदार अस्थिरता होती कारण गुंतवणूकदारांनी संध्याकाळी जाहीर होणाऱ्या, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित चलनवाढीचा डेटा जारी होण्यापूर्वी आणि नफा वसुली करून बाजूला राहणे पसंत केले. मिड, स्मॉलकॅप निर्देशांक 4% पर्यंत घसरले .मिडकॅप, स्मॉलकॅप्स समभागातील २०२३ मधील सर्वात मोठी घसरण ठरली. बाजार बंद होताना अत्यंत मामुली बदलांसह बंद झाला.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 94.05 अंकांनी वधारून 67,221.13 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 3.10 अंकांची घट होऊन निफ्टीने19,993.20 चा बंद दिला.Nifty ends near 20,000, Sensex gains; midcap, smallcaps post steepest fall in 2023
सेन्सेक्स 246 अंकांनी वधारला. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर बाजाराने बुधवारी पुन्हा वेग घेतला आणि सुमारे अर्धा टक्का वाढ दिसून आली. सपाट सुरुवात झाल्यानंतर, निफ्टीने हळूहळू वाढ केली आणि शेवटी 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 20070 च्या पातळीवर बंद झाला.
निफ्टी प्रथमच 20,000 च्या वर बंद झाला.धातू, तेल आणि वायू आणि बँकिंग क्षेत्रात चांगलीच वाढ झाली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 245.86 अंकांनी वधारून 67,466.99 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 76.80 अंकांची वाढ होऊन निफ्टीने20,070 चा बंद दिला. Sensex rises 246 pts.
विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सेन्सेक्स, निफ्टी स्थिरावले
बाजार आज विक्रमी-उच्च पातळीवर उघडला परंतू ती पातळी राखण्यात अयशस्वी ठरला. बाजार संपूर्ण दिवस एका विशिष्ठ पातळीभोवती फिरत राहिला तेल आणि वायू, धातू, रियल्टी आणि पीएसयू बँकांमधील समभागात खरेदीचा जोर दिसून आला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 52.01 अंकांनी वधारून 67,519.00 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 33.10 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 20,103.10 चा बंद दिला.Sensex, Nifty end flat after hitting record highs.
निफ्टी 20,200 च्या आसपास, सेन्सेक्स 320 अंकांनी वधारला
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चढउतार असून देखील बाजाराने विक्रमी प्रदर्शन सुरूच ठेवले. निफ्टीने प्रथमच 20,200 चा टप्पा ओलांडला.
सपोर्टिंग जागतिक संकेतांमुळे निर्देशांक विक्रमी उच्चांकावर उघडले आणि सकारात्मक क्षेत्रात राहिले,सत्रा दरम्यान काही नफा वसुलीदखील पाहावयास मिळाली. तथापी, अंतिम तासात निर्देशांकांनी ऑटो, आयटी आणि बँकांच्या समभागातील नेतृत्वाखाली नवीन विक्रमी उच्चांक गाठला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 319.63 अंकांनी वधारून 67,838.63 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 89.20 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 20,192.30 चा बंद दिला. Sensex extends winning run into 11th day, gains 320 pts; Nifty nears 20,200
( लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Techncal and Fundamental Analyst आहेत )
ML/KA/PGB
16 Sep 2023