लाचखोर IAS अधिकाऱ्याच्या घरातील पैसे मोजण्यासाठी आणावे लागले मशिन

 लाचखोर IAS अधिकाऱ्याच्या घरातील पैसे मोजण्यासाठी आणावे लागले मशिन

पुणे, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोटा मोजण्याचे मशिन तुम्ही फक्त बँकेमध्ये किंवा चित्रपटांमध्येच पाहीले असेल. मात्र पुणे येथे CBI ने IAS अधिकाऱ्याविरुद्ध केलेल्या कारवाईत त्यांच्या घरातील रक्कम मोजण्यासाठी चक्क मशिन मागवावे लागले आहे. पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड (IAS) सीबीआयच्या जाळ्यात अडकले आहेत. तब्बल 8 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने त्यांना रंगेहाथ अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हायवेलगतच्या एका जमिनीशी संबंधित हा व्यवहार होता.

या कारवाईनंतर दुपारी सीबीआयने रामोड यांचे कार्यालय, क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटी या खाजगी निवासस्थानीही छापा टाकला आहे. अधिकाऱ्यांनी याठिकाणी पैसे मोजण्याच्या दोन मशीन्स मागवून घेतल्या आहेत.

रामोड यांच्याविषयी मागील काही दिवसांपासून तक्रारी कानावरती येत होत्या. या तक्रारींची शाहनिशा करुन सीबीआयने रामोड यांच्याभोवती सापळा लावला होता. आज लाच स्वीकारताना अखेर सीबीआयने रामोड यांना अटक केली. रामोड हे मुळचे नांदेडचे असून मागील 2 वर्षांपासून ते पुण्यात अरितिक्त विभागीय आयुक्त आहेत.

दरम्यान एवढ्या मोठ्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर लाचखोरीच्या प्रकरणात कारवाई होण्याची ही पुण्यातील पहिलीच वेळ आहे.
SL/KA/SL
9 June 2023

SL/KA/SL

9 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *