या एका मोठ्या कंपनीने केली कर्मचारी कपात
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या काही दिवसात अमेरिकन कंपन्यांमध्ये चालू असणारे कर्मचारी कपातीचे सत्र थांबताना दिसत नाहीये.आता या दिग्गज कंपन्यांच्या रांगेत कर्मचारी कपातीच्या आता वॉल्ट डिस्नेचाही समावेश झाला आहे. कंपनीकडून सात हजार कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.
डिस्ने कंपनीतील खर्च कमी करण्यासाठी कंपनीने 7,000 कामगारांना काढून टाकण्याची योजना आखली आहे. कामाच्या संरचनेची पुनर्रचना करण्याची आणि खर्च कमी करण्यासाठी नोकर्या कमी करण्याचा विचार करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
बुधवारी कंपनीने सांगितले की, सीईओ पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बॉब इगर यांचा हा पहिला मोठा निर्णय मानला जात आहे.गेल्या वर्षाच्या अखेरीस त्यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली होती. डिस्नेच्या 2021 च्या वार्षिक अहवालानुसार, जगभरात कंपनीचे 1,90,000 कर्मचारी आहेत. त्यापैकी 80 टक्के पूर्णवेळ आहेत. मात्र, कंपनीच्या कापातीच्या निर्णयानंतर ही संख्या 3.6 टक्क्यांनी कमी होईल.
Disney च्या व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेने Disney+Hotstar ने 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत 3.8 दशलक्ष सशुल्क सदस्य गमावले आहेत. डिस्ने+ हॉटस्टारची सदस्य संख्या या तिमाहीत 57.5 दशलक्ष इतकी होती, जी मागील तिमाहीतील ६१.३ दशलक्ष वरून 6 टक्क्यांनी कमी आहे.
डिस्ने प्लस हॉटस्टारचे भारतातील ओटीटी मार्केटवर वर्चस्व आहे. भारतीय ओटीटी मार्केटमध्ये हॉटस्टारचा बाजार हिस्सा 29% च्या जवळ आहे. Amazon कडे 1.70 कोटी, Netflix कडे 50 लाख तर Disney Plus Hotstar चे 5 कोटी पेक्षा जास्त सशुल्क सदस्य आहेत.A large company has cut staff
ML/KA/PGB
9 Feb. 2023