मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ३० जानेवारीला तब्बल तीस परीक्षा होणार होत्या, मात्र त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. राज्यात लवकरच महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, या परीक्षा कधी होणार याचीही माहिती देण्यात आली आहे.A good news for all students studying in Mumbai University
मुंबई विद्यापीठातर्फे ३० जानेवारी २०२३ रोजी विविध अभ्यासक्रमांच्या एकूण तीस परीक्षा घेण्यात येणार होत्या. परंतु आता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून त्या ७ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात येणार आहेत. या एकूण तीस परीक्षांमध्ये खालील विषयांचे पेपर होते. विषय
Law, अभियांत्रिकी विज्ञान शाखेचे (M.Sc) चौथे सत्र, Commerce आणि अन्य संबंधित अभ्यासक्रमांचा समावेश होता.
तर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीमुळे मानवता विषयाच्या पदव्युत्तर पदवी सत्र तिसरे आणि चौथे, विधि अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, अभियांत्रिकी (Engineering : SE Sem III) अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, विज्ञान शाखेच्या एमएससी सत्र चौथे, एम एससी भाग दोन, वाणिज्य शाखेच्या, एमकॉम भाग दोन या परीक्षा 30 जानेवारी रोजी घेण्यात येणार होत्या. मात्र या सर्व परीक्षा आता 07 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहेत.A good news for all students studying in Mumbai University
कोणत्या विषयाच्या कुठल्या परीक्षा ढकलल्या पुढे
विषय
ह्युमॅनिटीज : एमए सेम III, एमए सेम II, सेम IV
लॉ एलएलएम : सेम III, बीबीए -एलएलबी सेम III
इंजिनिअरिंग : एसई सेम III
सायन्स: M.Sc Sem IV, M.Sc भाग II.
कॉमर्स: M.Com भाग II
एकूणच काय तर विद्यार्थ्यांनी या बदलण्यात आलेल्या तारखांची नोंद घ्यावी असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुले तुमचीही परीक्षा यामध्ये असेल तर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी अजून थोडा वेळ मिळणार आहे.
ML/KA/PGB
24 Jan. 2023