शेतकऱ्याने शोधली द्राक्षाची सिद्ध गोल्डन ही नवी जात

 शेतकऱ्याने शोधली द्राक्षाची सिद्ध गोल्डन ही नवी जात

सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कवलापूरच्या पोतदार द्राक्ष उत्पादक बंधू शेतकऱ्यानी सिद्ध गोल्डन नावाने द्राक्षाची नवीन जात शोधून केंद्र सरकारचे पेटंट मिळवले.A farmer discovered a new variety of grape, Siddha Golden

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर मधील पोतदार बंधूनी आपल्या द्राक्ष शेतीतील वर्षानुवर्षांच्या अनुभवावर आणि अभ्यासाच्या जोरावर द्राक्षाचा नवीन वाण विकसित केला.

शशीधर पोतदार, रवींद्र पोतदार अशी या दोन भावाची नावे असून त्यांनी सिद्ध गोल्डन नावाने द्राक्षाची नवीन वाण विकसित केला.

केंद्र सरकारचे या सिद्ध गोल्डन नावाने पेटंट देखील मिळवले आहे. आता आपल्या 2 एकरात या पोतदार बंधूनी सिद्ध गोल्डन जातीच्या वाणाची लागवड केली. जाडी आणि लांबी भरपूर, मनी ड्रापिंग कमी तसेच इतर द्राक्षच्या जातीपेक्षा या सिद्ध गोल्डन जातीच्या द्राक्षाना मिळणारा जादा दर , किंबहुना दुप्पट दर मिळतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे सिद्ध गोल्डन नावाचे नवीन द्राक्षचे वाण फायदेशीर ठरणार आहे.

ML/KA/PGB
19 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *