गोविंद देवगिरी महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आळंदीत सोहळा

 गोविंद देवगिरी महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आळंदीत सोहळा

पुणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील आळंदी येथे रामलला मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांच्या अमृमहोत्सवानिमित्त गिताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन 4 फेब्रुवारी पासून सुरू आहे.. आज या महोत्सवाचा समारोप होत असून कांची काम पिठाचे शंकराचार्य विजेंद्र सरवस्वती ,योगगुरु बाबा रामदेव आदी मान्यवर संत उपस्थित होते. या वेळी शंख नादात वेद मत्रो उच्यार सह जयघोषित जन्मदिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत जाऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली, अशा भावना योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला श्री. श्री. गोविंद महाराज, बाबा रामदेव, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरे टोप घालून सत्कार करण्यात आला.

योगी आदित्यनाथ यांनी मला आज पावन आळंदी भूमीत येण्याचं सौभाग्य लाभलं. मी सनातन धर्मासाठी काम करत आलेलो आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीला नतमस्तक होतो. अगदी लहान होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली. तेव्हापासून आळंदीत येण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे “ असे सांगून ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. पुढे ते म्हणाले, याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही.

महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठापना झाली तसेच मथुरेत श्री कृष्णाचं मंदिरात श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना लवकरच होइल.. काशीत भगवान विश्र्वेश्वर यांनी आपला मार्ग मोकळा केला असल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. A celebration on the occasion of Govind Devagiri Maharaj’s Amritmahotsava

ML/KA/PGB
11 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *