मोबाईल अँपद्वारे भक्तांवर नजर ठेवणाऱ्या भोंदू बाबाला अटक

पुणे, दि. २८ : आधुनिक काळात लोकांच्या भावनांचा फायदा घेणारी बाबा-बुवाही अत्याधुनिक साधने वापरू लागली आहेत. पोथ्यांमध्ये दिसणारे बाबा आता लोकांच्या मोबाईलमध्येही डोकावू लागले आहेत. आपल्याकडे दिव्यशक्ती असल्याचे भासवत मोबाईल अँपद्वारे भक्तांवर नजर ठेवणाऱ्या भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद दादा उर्फ दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबाचे नाव आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी एका भोंदू बाबाला अटक केलीय. प्रसाद दादा उर्फ दादा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या 29 वर्षीय भोंदू बाबाच नाव आहे. त्याच्या विरुद्ध एका 39 वर्षीय व्यक्तींन बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार या भोंदू बाबांन त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच बसवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले.
या भोंदू बाबांनी फिर्यादीच्या मोबाईल मध्ये एक ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवत फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या खाजगी घटनांवर लक्ष ठेवले. एवढेच नाही तर फिर्यादीला प्रेयसीबरोबर अश्लील कृत्य त्याच बरोबर वेश्या गमन करण्यासही भाग पाडल्याचं आणि मोबाईल ॲपद्वारे ते बाबाने पाहिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे.दरम्यान, या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.