महापालिका इ विभाग कार्यालयाच्या नवीन इमारतीचे झाले सादरीकरण

मुंबई,दि २७
बृहन्मुंबई महानगरपालिका ई” विभाग कार्यालयांचे पुनर्बांधणी होणार असून त्याजागी आयकॉन इमारत कार्यालय म्हणून उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याचे इ वॉर्ड महापालिका कार्यालय हे आता माझगाव म्हाडा कॉलनी, घोडपदेव येथे स्थलांतरीत करण्यात येत आहे. ई वॉर्ड येथे पुनर्बांधणी होत असलेल्या आयकॉन इमारतीच्या वास्तुचे महानगरपालिका आयुक्त श्री.भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहरे) सौ.अश्विनी जोशी यांनी केलेल्या सुचनेनुसार आमदार मनोज पांडुरंग जामसुतकर यांच्यासह महानगरपालिका उपायुक्त, परिमंडळ – १ च्या संगीता हसनाळे व सहाय्यक आयुक्त रोहित त्रिवेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक स्वरूपाची माहिती आणि नकाशे यांचे सादरीकरण इ वॉर्ड महापालिका कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे),भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर,विधानसभा संघटक ॲड. मंगेश बनसोड,उपविभाग प्रमुख राम सावंत, विजय कामतेकर, सहसंघटक, नगरसेवक सुर्यकांत पाटील, सहसंघटक हेमंत कदम, शाखाप्रमुख काका चव्हाण, सलीम शेख आणि इतर पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते. KK/ML/MS