भाषेच्या मुद्द्यावर विरोधक खोटे नरेटीव्ह सेट करतेय

मुंबई, दि. २७ — महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची असून इतर भाषांना ऑप्शन्स देण्यात यावेत, ही महायुती सरकारची स्पष्ट भूमिका आहे. सरकारच्यावतीने वारंवार ही भूमिका मांडूनही विरोधक मात्र या विषयावर खोटे नरेटीव्ह सेट करत आहेत अशी टिका भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली.
अखिल भारतीय कामगार सेनेचे माजी सरचिटणीस आणि माथाडी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रशांत काकडे यांनी आज भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या प्रवेशाच्या प्रसंगी उबाठा कामगार सेनेचे माजी सरचिटणीस डॉ. प्रशांत काकडे यांनी शुक्रवारी आपल्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. डॉ. काकडे यांच्यासमवेत कामगार सेनेच्या शेखर पवार, वर्षा माळी, विजय हरिहर, बाबुलाल पुजारी या कार्यकर्त्यांनी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस नेते गिरीश मसुरकर यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
यावेळी प्रसिध्द माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, दोन्ही ठाकरे बंधू यांचे पक्ष स्वतंत्र व वेगळे आहेत, त्यामुळे त्यांनी काय करावे व काय करु नये हे एवढं सांगणारा मी मोठा नाही, त्यामुळे तो त्यांचा निर्णय त्यांनी घेतला असेल तर त्याची मला माहिती नाही. गेल्या २०-२५ वर्षांमध्ये वीज दरात सातत्याने वाढ होत आहे. परंतु मात्र वीज दर कमी करण्यासाठी नक्की प्रयत्न करेन, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
त्यानी दिलेल्या आश्वासनानुसार आज सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून दिली आहे. तसेच घरगुती वीज ग्राहकांसाठी वीज दरात मोठी कपात करण्याच्या दिशेने पावलं उचलली आहेत असेही रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
चव्हाण यांनी सांगितले की डॉ. काकडे हे कामगार क्षेत्रातील धडाडीचे कार्यकर्ते आहेत. विमानतळ सेवा क्षेत्रात विदेशी कंपन्यांना बंदी करावी, अशी मागणी डॉ. काकडे यांनी पूर्वीपासून केली होती. मात्र उबाठा सेनेने या मागणीकडे दुर्लक्ष केले.
पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने विमानतळ सेवा क्षेत्रात परदेशी कंपन्यांना बंदी करण्याचा निर्णय घेतला. कामगार हितासाठी मोदी सरकार व फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे डॉ. काकडे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामगार हितासाठीच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यासाठी भाजपा संघटना पूर्णपणे प्रयत्न करेल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
डॉ. काकडे हे उबाठा सेनेत गेली 35 वर्षे विविध पदावर कार्यरत होते. शिक्षण, कामगार क्षेत्रात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. पक्षाच्या विविध आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. यावेळी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे सुहास माटे, सरचिटणीस रवि अनासपुरे, माध्यम प्रमुख नवनाथ बन आदी पदाधिकारी उपस्थित होते. ML/ML/MS