श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची पायी दिंडी मार्गस्थ

 श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची पायी दिंडी मार्गस्थ

बीड दि २५– गेल्या 130 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाची यंदाची पायी दिंडी अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये पंढरीच्या पांडुरंगाच्या दिशेने नतमस्तक होण्यासाठी हजारो भावी भक्तांच्या उपस्थितीमध्ये आज मार्गस्थ झाली.

गहिनी प्रसादे निवृत्ती दातारे ,ज्ञानदेवा सार चोजविले l

संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी च्या समारोपात गहिनीनाथांचे महत्व सांगितले आहे .नाथ संप्रदायातील गहिनीनाथ हे एक नाथ , यांच्या नावाने राज्यातील एकमेव पालखी दिंडी ची परंपरा अनेक वर्षापासून सुरु आहे.

नाथांचे शिष्य असलेले संत वामनभाऊ यांनी या पालखीची सुरुवात सुमारे 130 वर्षापूर्वी केली . आजही ही परंपरा सुरु आहे.आज ह्या पालखी दिंडी ने पंढरपूर कडे प्रस्थान केले .
नाथांच्या समाधीचे पूजन करून पालखीत पादुका ठेवण्यात आल्या. त्यानंतर पालखीने प्रस्थान केले . या पालखीमध्ये बीड जिल्ह्यातील गहीनीनाथ यांच्या आणि वामनभाऊ यांच्या हजारो अनुयायांचा समावेश आहे. शिस्त बद्ध आणि सर्व समावेशक असलेल्या दिंडीचे नियोजन या गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.

ऊसतोडणी कामगारांचा हा जिल्हा असल्याने दिंडी मध्ये महिला, ऊसतोडणी कामगार यांची संख्या अधिक आहे. पंढरपूरच्या विठुरायाला एकादशीच्या निमित्ताने भेटण्यासाठी पायी दिंडी सोहळा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संत वामनभाऊ महाराजांच्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरील समाधी ला नतमस्तक होऊन सुरुवात झाला.

विविध ठिकाणी मुक्कामाला ही दिंडी असेल. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर आज विविध जाती धर्म पंथांचे आणि विविध तालुका आणि जिल्ह्यातील भाविक भक्त एकत्र झाले आणि हरिनामाच्या जयघोषाने या दिंडीला अवघे पंढरीचे वातावरण निर्माण झाले. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह भ प महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा पायी दिंडी सोहळा मार्गस्थ होताना अत्यंत पवित्र आणि अध्यात्मिक वातावरणाने परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *