भूमिपुत्रांना बँकेत नोकरी द्या अन्यथा शिवसेना आंदोलन करणार

 भूमिपुत्रांना बँकेत नोकरी द्या अन्यथा शिवसेना आंदोलन करणार

मुंबई, दि २५
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक १२ च्या वतीने खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बे मार्केटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या ठिकाणी स्थानिक उमेदवारांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे याकरता या करता त्यांच्या मोहम्मद अली रोड येथील मुख्य कार्यालयात दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख संतोष शिंदे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी भेट देऊन निवेदन दिले. यामध्ये त्यांनी २०२३,२०२४,२०२५ मध्ये बँकेत नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी किती जण स्थानिक आहेत याची माहिती द्यावी. तसेच त्यांच्याकडे डोमासाईल प्रमाणपत्र आहे का याची स्पष्ट माहिती देण्यात यावी. स्थानिक तरुणांना नोकरीत प्राधान्य मिळावे या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. याची गंभीर दखल घेऊन तातडीने स्थानिक उमेदवारांना भरती करून न्याय द्यावा ही विनंती केली. जर न्याय दिला गेला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्टाईलने आंदोलन उभे राहिल आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस आपण जबाबदार असाल याची कृपया नोंद घेऊन त्वरित कारवाई व्हावी अशी माहिती शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी दिली. यावेळी विधानसभा प्रमुख विकास मयेकर, विधानसभाप्रमुख राजू फोडकर, समन्वयक सुनील कदम , उपविभाग प्रमुख बाजीराव मालुसरे,शाखाप्रमुख वैभव मयेकर, कृष्णा कांबळे, मुख्तार पोपेरे, अजय शेडगे, स्वप्निल कोळी, माजी शाखाप्रमुख अशोक देसाई आणि शिवसैनिक उपस्थित होते. KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *