शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनाला मान्यता

मुंबई, दि. २४ : राज्य सरकारने आज शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. सांगली- कोल्हापूरमधील शेतकऱ्यांच्या या महामार्गाला मोठा विरोध होत आहे.
शासन निर्णय
महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग – पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता. राज्यातील साडेतीन शक्तिपीठ , दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाई सहित १८ तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग. प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार, प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)