आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानशी पाच लाख लोकांना जोडण्याचा संकल्प

 आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानशी पाच लाख लोकांना जोडण्याचा संकल्प

मुंबई, दि २३
नोकरी,कामधंदा, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई महानगरक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या परंतु मूळचे सातारा जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या सुमारे पाच लाखाहून अधिक सातारकारांशी संपर्क करण्याचा संकल्प ‘आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान’ने केला आहे.
आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानची अंगीकृत संघटना असलेल्या आम्ही सातारकर उद्योजक या संघटनेची एक बैठक करीरोड येथील न्यू सातारा सहकारी पतपेढीच्या कार्यालयात झाली. त्यावेळी हा संकल्प करण्यात आला. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने म्हणाले आपल्या कामात आपण सातत्य ठेवले तर पहिल्या टप्प्यातच मुंबई महानगर क्षेत्रातील एक लाख सातारकरांपर्यंत आपण मुंबईत पोहोचू शकतो. याबाबत आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
आपल्या आम्ही सातारकर प्रतिष्ठानकडे जास्तीत जास्त युवकांना जोडायचे असेल तर आपल्याला फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाटसअप या डिजिटल माध्यमांचा वापर करावा लागेल,असे निलेश फाळके यांनी सांगितले. याबाबत उदय सर्वगोड,उत्तम केंजळे यांनीही सूचना केली. डिजिटल माध्यमाचा वापर केला पाहिजे हे अगदी बरोबर असल्याचे बाबुराव माने यांनी स्पष्ट केले.
आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना निकम म्हणाले डिजिटल माध्यमाचा वापर आपल्या सातारकर मंडळींना जोडण्यासाठी निश्चित करता येईल. आज सुद्धा ही यंत्रणा आपल्याकडे आहे.फक्त ही यंत्रणा अद्ययावत करण्याची गरज आहे.फक्त डिजिटल माध्यमाचा गैरवापर होणार नाही याची दक्षता आपल्याला सर्वांना घ्यावे लागेल असेही नाना निकम यांनी सांगितले.

लोणंदला वारकऱ्यांना लाडू वाटणार

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे राज्याच्या विविध भागातून हजारो दिंड्या निघालेल्या आहेत.या दिंड्यामधील वारकऱ्यांना लोणंद येथे येत्या २६ जून रोजी लाडुचे वाटप आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.हे लाडू वाटप प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना निकम,उपाध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या बैठकीस अध्यक्ष नाना राजाराम निकम, उपाध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने, अ‍ॅड राजाराम शिंदे, एकनाथ तांबेकर, अ‍ॅड अशोक चव्हाण,कृष्णा नलावडे, उदय सर्वगोड, हनुमंत भिलारे, विकास चव्हाण, श्रीमती पद्माताई शिंदे, उत्तम केंजळे, निलेश फडके,श्रीधर फडतरे आदी उपस्थित होते. KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *