चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना RCB कडून १० लाख रु. मदत

 चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना RCB कडून १० लाख रु. मदत

दि. ५, बंगळुरु : येथे काल झालेल्या एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत RCB च्या 11 चाहत्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरु फ्रँचायजीने मोठा निर्णय घेतला आहे. RCB फ्रँचायजीने 11 मृतांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. आरसीबीने मृतांच्या कुटुंबासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना मदत करता यावी, यासाठी आरसीबीकडून ‘RCB Cares’ नावाचा एक निधी देखील तयार केला जात आहे. याबाबतची माहिती आरसीबीकडून सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे.

पोलिसांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि वाहतूक कोंडी होऊ नये, यामुळे RCBच्या विजयी मिरवणुकीसाठी परवानगी नाकारली. त्यामुळे स्टेडियममध्ये या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. एम चिन्नास्वामी स्टेडियमची आसन क्षमता ही 30-35 हजार इतकी आहे. त्यात या कार्यक्रमासाठी चाहत्यांना फ्री एन्ट्री होती. त्यामुळे ही तोबा गर्दी झाली. स्टेडियम पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर गेट बंद करण्यात आलं. मात्र त्यानंतरही लाखोंच्या संख्येत आलेले चाहते ऐकायला तयार नव्हते. त्यांनाही स्टेडियममध्ये जायचं होतं. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि चाहत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. त्यामुळे जमावला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे धावाधाव झाली. यात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 11 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे RCB च्या विजयाला गालबोट लागले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *