कनिष्क विमान अपघातापासून दहशतवादाचा चेहरा साकिब नाचन

 कनिष्क विमान अपघातापासून दहशतवादाचा चेहरा साकिब नाचन

मिलिंद लिमये
मुंबई दि २– कनिष्क विमान अपघातापासून मुंबई घाटकोपर स्फोट आणि गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांवरील हल्ले अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या साकीब नाचन च्या घराची आज झडती घेण्यात आली.या विमान अपघातापासून भारतीय दहशतवादाचा प्रमुख चेहरा म्हणून नाचण कुख्यात झालेला आहे.

साकीब नाचन सध्या तिहारच्या तुरुंगात आहे. 9 डिसेंबर 2023 रोजी एन आय ए ने छापा घालून भिवंडी तालुक्यातील पडघा इथल्या बोरिवली गावातून साकिब नाचन याच्यासह त्याचा मुलगा नातेवाईक आणि एकूण 15 जणांना अटक केली होती.

1992 सालापासून साकिब नाचन याचा देशद्रोही कारवायांमधील सहभाग आहे. 1992 साली तत्कालीन सिमी या बंदी घातलेल्या संघटनेचा तो राष्ट्रीय सरचिटणीस होता. कॅनडामध्ये झालेल्या कनिष्क विमाना अपघातात खलिस्तानी अतिरेक्यांचा सहभाग होता. त्यांना मदत करणारी संघटना म्हणून सीनीचे नाव पुढे आले होते , त्यावेळी सीबीआयने नाचनला अटक केली होती 1992 ते 2002 या काळात तो गुजरातमधल्या कारागृहात शिक्षा भोगत होता .

2002 मध्ये गुजराततून तो सुटला आणि त्यानंतर भिवंडी परिसरातील तीन खून खटल्यांमध्ये तो आरोपी म्हणून अटक झाला. भिवंडी मधील ललित जैन या गोरक्ष समितीच्या कार्यकर्त्याची हत्या झाली होती तर भिवंडी मध्येच शेरेकर नावाच्या वकिलाची देखील हत्या झाली होती. त्यासोबतच साकीब राहत असलेल्या बोरिवली गावातील काँग्रेस कार्यकर्ता असणाऱ्या तारीक गुजर याची देखील हत्या करण्यात आली होती. या तिन्ही हत्यांमध्ये साकिब नाचन संशयित आरोपी होता, मात्र कालांतराने तो निर्दोष सुटला.

मुंबई मध्ये झालेल्या घाटकोपर येथील बॉम्बस्फोटाच्या आरोपांमध्ये तो पुन्हा पकडला गेला. त्यावेळी मुंबई क्राईम ब्रँच प्रदीप शर्मा यांच्या पथकाने त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला असता बोरिवली गावात संपूर्ण गावानेच या पोलीस पथकावर दगडफेक केली होती. या संदर्भात चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याही परिस्थितीत त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्या घरासमोरील विहिरीतून शस्त्र हस्तगत करण्यात आली होती.

याच दरम्यान भिवंडी मधील गोरक्ष समितीचा कार्यकर्ता असणाऱ्या मनोज रायच्या या वकिलावर गोळीबार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. यावेळी त्याचा मुलगा शामिल हा देखील सह आरोपी होता. 2002 ते 2012 असा आणखी दहा वर्षांचा काळ साकिब ने कारागृहात घालवला आहे. त्यादरम्यान त्याच्यावर घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी पोटाअंतर्गत तर मनोज रायच्या हल्ला प्रकरणी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे, रायचा हल्ला प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालया पर्यंत गेलं होतं, आधी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं त्यात त्याचा जामीन फेटाळण्यात आला अशी माहिती तत्कालीन तपास अधिकारी रवींद्र दौंडकर आणि बाबा मुल्ला यांनी दिली. आता डिसेंबर 2023 पासून राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने त्याला देश विघातक कारवायांसाठी ताब्यात घेतले असून तो सध्या तिहार तुरुंगात आहे.

आज साकिब नाचन याच्यासह बोरिवली गावातील अनेक संशयित घरांवर छापे टाकण्यात आले असून यात बारा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. साकिब सह त्यांच्या घरातून लॅपटॉप , मोबाईल, कम्प्युटर आणि अन्य साधनसामग्री जप्त करण्यात आली आहे. यात काही आक्षेपार्ह आढळल्यास साकीब नाचन आणि इतरांवर या पुढील कारवाई होणे अपेक्षित आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *