पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते WAVES 2025 चे उद्घाटन

मुंबई, दि. १ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे WAVES 2025 (World Audio Visual & Entertainment Summit) या भारताच्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. ही चार दिवसीय परिषद 1 ते 4 मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेचे घोषवाक्य आहे “Connecting Creators, Connecting Countries”, ज्यामध्ये भारताच्या सर्जनशीलतेचे जागतिक प्रदर्शन केले जाते. महाराष्ट्र शासनाने यजमानपद भूषवलेल्या या परिषदेचा उद्देश भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाचे जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करणे आहे.
परिषदेतील मुख्य वैशिष्ट्ये:
90 हून अधिक देशांचे प्रतिनिधी आणि 10,000 प्रतिनिधी सहभागी.
1,000 कलाकार, 350 स्टार्टअप्स, आणि 300 कंपन्या उपस्थित.
42 मुख्य सत्रे, 39 विशेष सत्रे, आणि 32 मास्टरक्लासेस आयोजित.
ग्लोबल मीडिया डायलॉग (GMD) मध्ये 25 देशांचे मंत्री सहभागी होणार.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भारताच्या सर्जनशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि “Create in India, Create for the World” यावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,
‘आज १ मे आहे. आजच्या दिवशी, ११२ वर्षांपूर्वी ३ मे १९१३ रोजी, भारतातील पहिला चित्रपट, राजा हरिश्चंद्र, प्रदर्शित झाला. त्याचे निर्माते दादासाहेब फाळके होते आणि काल त्यांचा वाढदिवस होता. गेल्या शतकात, भारतीय चित्रपटसृष्टीने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात यश मिळवले आहे. प्रत्येक कथा भारतीय संस्कृतीचा आवाज बनली आहे आणि जगभरातील लाखो लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचली आहे. .
या परिषदेच्या माध्यमातून 2029 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेचे दरवाजे उघडले जातील, असा अंदाज आहे.