ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे निधन

 ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे निधन

व्हॅक्टीकन सिटी, दि, २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे आज सकाळी निधन झाले. यामुळे जगभरातील ख्रिस्तीबांधवांवर शोककळा पसरली आहे. पोप फ्रान्सिस हे अर्जेंटिनाचे जेसुइट धर्मगुरू होते. २०१३ मध्ये रोमन कॅथोलिक चर्चचे २६६ वे पोप बनले. त्यांना पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आले. पोप फ्रान्सिस हे गेल्या १००० वर्षातील युरोपियन नसुही कॅथोलिक धर्मात सर्वोच्च पदावर पोहोचलेले पहिली व्यक्ती होते.

पोपचा जन्म १७ डिसेंबर १९३६ रोजी अर्जेंटिनामधील फ्लोरेन्स येथे झाला. पोप होण्यापूर्वी ते जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ या नावाने ओळखले जात होते. पोप फ्रान्सिसचे आजी-आजोबा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनीपासून वाचण्यासाठी इटली सोडून अर्जेंटिनाला गेले. पोपने त्यांचे बहुतेक आयुष्य अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समध्ये घालवले आहे.

पोप फ्रान्सिस यांच्या काळातील महत्त्वाचे निर्णय

  • समलिंगी लोकांच्या चर्चमध्ये प्रवेश देण्याबाबत स्पष्ट भूमिका
  • पुनर्विवाहासाठी धार्मिक मान्यता
  • चर्चमध्ये होणाऱ्या बाल लैंगिक शोषणाबद्दल मागितली माफी

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *