सोने लवकरच गाठणार लाखांचा पल्ला…

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐन लग्नसराईत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्याच्या किमतीने वऱ्हाडी मंडळींना घाम फुटला आहे. सोने हळूहळू १ लाख रुपये तोळा हा दर गाठण्याच्या बेतात आहे. : देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचे भाव ९५ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या पुढे गेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या होणारी प्रचंड खरेदी याला कारण ठरत आहेत. अमेरिकी ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी तुफान वाढली आहे. म्हणून राज्यातील सोन्याची प्रमुख बाजार पेठ असलेल्या मुंबई, पुणे, जळगाव या शहरांमध्येही सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
देशाची राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,८१० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ८७,८२६ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तसेच चांदीची किंमत ९५,७१० रुपये प्रति किलो आहे.