शिवजयंतीच्यानिमित्ताने ‘छावा’ची संपूर्ण टीम पोहोचली रायगडावर, विकी कौशलने शेअर केले फोटोज

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज शिवजयंतीच्यानिमित्ताने ‘छावा’ची संपूर्ण टीम रायगडावर पोहोचली होती. याचे फोटो विकी कौशलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.‘छावा’ सिनेमा प्रदर्शित होण्याआधी विकी कौशलने सर्वात आधी रायगडावर जायचंय असं म्हटलं होतं. अखेर विकी आज मराठमोळ्या अंदाजात डोक्यावर फेटा बांधून रायगडावर पोहोचला. त्याच्यासह दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, निर्माते दिनेश विजन ही सगळी मंडळी रायगडावर उपस्थित होती. विकीने फोटो पोस्ट करताना, “आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मला रायगडावर जाण्याचं सौभाग्य मिळालं. यानिमित्ताने मी पहिल्यांदाच रायगडावर गेलो. महाराजांचा आशीर्वाद घेण्याची यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही. तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे!”असे म्हटले आहे.
ML/ML/PGB 19 Feb 2025