ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत विक्रमी वाढ

 ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत विक्रमी वाढ

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत तब्बल ७७ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एकूण २४,३३६ स्कूटर विकल्या. डिसेंबर २०२४ मध्ये, ओला इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत लक्षणीय घट झाली पाहायला मिळाली होती. गेल्या जानेवारीत ओला इलेक्ट्रिकने इतर सर्व कंपन्यांना मागे टाकले. यामध्ये टीव्हीएस मोटर कंपनी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि तसेच कंपनीने आयक्यूबच्या २३,८०९ युनिट्स विकल्या गेल्या. बजाज ऑटोने चेतकच्या २१,३१० युनिट्स विकल्या. एथर एनर्जीने १२९०६ युनिट्स सेल केले. त्याच वेळी, ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडने ३६११ इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या.

जानेवारीमध्ये सर्व टॉप १० इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांच्या विक्रीत मासिक वाढ पाहायला मिळाली. यामध्ये, ओला इलेक्ट्रिक, टीव्हीएस आणि बिगॉस सारख्या कंपन्यांच्या प्रोडक्शनच्या विक्रीत सर्वाधिक वाढ दिसून आली. ओलाची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल ओला रोडस्टर एक्स इंडियन मार्केटमध्ये लाँच झाली आहे, ज्याची एक्स शोरुम किंमत ७४९९९ रुपये आहे. या बाईकची डिलिव्हरी मार्च २०२५ पासून सुरू होईल.

SL/ML/SL

10 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *