विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने जिबीएस रोगाचा प्रादुर्भाव
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यामध्ये विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे जीबीएस या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला असे निष्पन्न झाल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना क्लोरीनयुक्त स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती ही त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली .
जीबीएस या रोगाबद्दल राज्य शासनाने अनेक खात्यांची एक संयुक्त समिती तयार केली असून ही समिती एकमेकांशी समन्वय ठेवून एकत्रितपणे काम करणार आहे. असे आबिटकर यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाचा आरोग्य विभाग, नगर विकास विभाग, अन्न आणि औषध प्रशासन आदी विभागांची समिती तयार करण्यात आलेली आहे . दूषित पाणी हा अनेक खेडी आणि शहरे यामधील मोठा प्रश्न असून विशेषतः पुण्यात या पाण्यामुळे अशा पाण्यामुळेच हा आजार पसरला असे आबिटकर म्हणाले.
पोल्ट्री व्यवसायातील सांडपाणी जवळच्या विहिरींमध्ये जाऊन त्यामुळे तेथील पाणी दूषित झाले आहे की काय अशी शंका आरोग्य विभागाला असून त्यासाठी 67 पोल्ट्री फार्मचे सांडपाणी नमुने ताब्यात घेऊन ते कोलकत्ता आणि हैदराबाद येथील एनआयव्ही अर्थात राष्ट्रीय संसर्गजन्य आजार विषयक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत अशी माहिती यावेळी उपस्थित असलेले राज्याचे आरोग्य सचिव निपुण विनायक यांनी दिली.
सध्या जीबीएस रोगाचे 163 रुग्ण राज्यात असून त्यांनी वेळेवर औषध उपचार घ्यावेत यासाठी राज्य शासन आरोग्य विभागामार्फत त्यांची पुरेपूर काळजी घेत आहे. ज्यांचा मृत्यू झाला अशा पाच जणांनी वेळेवर उपचार घेतले नाहीत आणि निष्काळजीपणा दाखवल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रकाश आबिटकर यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
ML/ML/SL
4 Feb. 2025