महाकुंभात चेंगराचेंगरी सतरा मृत्यू, शंभर हून अधिक जखमी
प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात काल रात्री (29 जानेवारी) दुर्दैवी घटना घडली. गर्दीच्या चेंगराचेंगरीत सतरा भाविकांचा मृत्यू झाला असून, शंभर हून अधिक जखमी झाले आहेत.या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. परंतु, मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या गर्दीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.प्रशासनाने भाविकांना संयम पाळण्याचे आवाहन केले असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. या घटनेने महाकुंभातील व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.