पहील्या स्वदेशी सोलर इलेक्ट्रिक कारचे बुकिंग सुरू
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑटो एक्स्पो 2025 मध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार सादर केल्या, या एक्स्पोमध्ये EVA सोलर इलेक्ट्रिक कार देखील लाँच करण्यात आली, ही कार लाँच होताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कारची किंमत 3.25 लाख रुपये ते 5.99 लाख रुपयांपर्यंत आहे.
ईव्हीए सोलर इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू झाली आहे. ग्राहक ही कार 5000 रुपये देऊन बुक करु शकतात. एक सांगायचे झाल्यास फक्त पहिल्या 25,000 ग्राहकांनाच सुरुवातीच्या किंमतीचा लाभ मिळेल. या कारची किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू होते.
या इलेक्ट्रिक कारच्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचे झाले तर, ही कार एका चार्जवर 250 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. ही कार ही कार वर्षाला 3000 किमी पर्यंत चालवता येते. वायवे मोबिलिटीने दावा केला आहे की ही सोलवर चालणारी इलेक्ट्रिक कार फक्त 0.50 पैसे प्रति किलोमीटर या दराने धावू शकते.
ही कार तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. जर तुम्ही बॅटरी रेंटल प्रोग्राम अंतर्गत ही कार खरेदी केली तर तुम्हाला ही कार 3.05 लाख रुपयांना मिळेल, तर जर तुम्ही ही कार बॅटरीसह घेतली तर याची किंमत 3.99 लाख रुपये आहे. ही सोलरवर चालणारी इलेक्ट्रिक कार फक्त पहिल्या 25,000 ग्राहकांना विकली जाईल.
SL/ML/SL
25 Jan. 2025