स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी देणार महाकुंभ मेळ्याला भेट
प्रयागराज,दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दर १२ वर्षांनी येणारा प्रयागराज येथे होणारा कुंभमेळा यंदा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या 450 दशलक्ष यात्रेकरू, संत आणि पर्यटकांच्या सहभागासाठी उत्तर प्रदेश सरकारने तयारी केली आहे. या महाकुंभ-2025 मेळाव्या जगभराती श्रद्धाळु येत आहेत. मिडिया रिपोर्टनुसार या महाकुंभ मेळाव्यास अॅप्पल कंपनीचे सह संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी आणि जगातील अब्जाधीश महिला लॉरेन पॉवेल या देखील उपस्थित रहाणार आहेत. या लॉरेन पॉवेल यांना टाइम्स मॅगझिनने अनेक वेळा जगातील प्रभावशाली श्रीमंत व्यक्ती म्हणून समाविष्ठ केले आहे.
महाकुंभ मेळाव्यात लॉरेन कल्पवास देखील करणार आहेत. त्यांना एक हिंदू नाव देखील देण्यात आले आहे. या संदर्भात मीडियाशी बोलताना गुरु स्वामी कैलाशानंदजी महाराज यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की ॲप्पलचे सहसंस्थापक स्वर्गीय स्टीव्ह जॉब्स यांचा साल २०११ मध्ये दुर्धर आजाराने मृत्यू झाला होता. स्वामी कैलाशानंद यांनी सांगितले की त्या आपल्या गुरुला भेटण्यासाठी येथे येत आहेत. आम्ही त्यांना आमचे गोत्रही दिले आहे. आणि त्यांचे नाव ‘कमला ‘ असे ठेवले आहे. त्या आमच्या मुली प्रमाणे आहेत. त्या दुसऱ्यांदा भारताला भेट देत आहेत. महाकुंभ मेळाव्यात त्यांचे स्वागत आहे असेही स्वामी कैलाशानंद यांनी सांगितले.
यंदाचा कुंभमेळा हा प्लास्टिक मुक्त असेल. तसेच कुंभमेळ्यादरम्यान पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी 35 विद्यमान कायमस्वरूपी घाट आणि 9 नवीन घाट बांधण्यात आले आहेत. कुंभमेळ्याची याची तयारी आता अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. या निमित्ताने जमा होणाऱ्या लक्षावधी भाविकांच्या सुरक्षितचीही विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र यावेळी या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणारे पोलीस हे शाकाहारी आणि मद्यपान न करणारे असतील याची खात्री बाळगली जाणार आहे.
SL/ML/SL
10 Jan. 2025