अठरा वर्षीय शौर्या ने गाजवले फडकवला कायगर शिखरावर झेंडा

 अठरा वर्षीय शौर्या ने गाजवले फडकवला कायगर शिखरावर झेंडा

यवतमाळ , दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
लेह लडाख मधील माउंट कायगर री हे अत्यंत कठीण शिखर म्हणून गणल्या जाते.
या शिखराची उंची 6176 मीटर एवढी आहे. मात्र यवतमाळ येथील अवघ्या 18 वर्षाच्या शौर्या बजाज या तरुणीने हे शिखर पार करून तिरंगा फडकवला आहे.
विशेष म्हणजे यावेळी तापमानाचा पारा 37 अंश इतका खाली होता आणि प्रचंड हिमवारे येथे वाहत होते . तरीही शौर्याने न डगमगता शिखर पार केले आणि सर्वात कमी वयात हे शिखर पार केल्याचा विक्रम तिच्या नावे नोंदवला गेला.

जागतिक कीर्तीचे गिर्यारोहक रिकी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम शौर्या बजाज हिने यशस्वी केली . अफाट शारीरिक क्षमता, दृढनिश्चय आणि कणखर मानसिक सहनशक्ती यामुळे शौर्या यशस्वी झाली.गिर्यारोहणासाठी हे शिखर अत्यंत आव्हानात्मक म्हणून ओळखले जाते . तिच्या या भव्यदिव्य यशाबद्दल यवतमाळ येथील लोकप्रतिनिधी, तथा विविध सामाजिक कार्यकर्ते तिचे अभिनंदन करीत आहेत.

ML/ML/PGB 7 Jan 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *