बांग्लादेशींना भारतीय पासपोर्ट मिळवून देणाऱ्या मास्टर माईंडला अटक

 बांग्लादेशींना भारतीय पासपोर्ट मिळवून देणाऱ्या मास्टर माईंडला अटक

कोलकाता, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांगलादेशातील राजकीय अस्थैर्यामुळे तेथील हिंदूंना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या घुसखोरांना आपल्या देशातील काही गद्दारच मदत करत आहेत. बांगलादेशींना भारतीय पासपोर्ट देणारे मोठे रॅकेट चालवणारा मास्टर माईंड आता प. बंगालमध्ये पोलीसांच्या तावडीत सापडला आहे. टूर्स एण्ड ट्रॅव्हल एजन्सी मार्फत हे रॅकेट चालायचे. या ‘टुर्स एण्ड ट्रॅव्हल्स’ कंपनीच्या माध्यमातून या आरोपीने आतापर्यंत १०० बांग्लादेशींना भारतीय पासपोर्ट देऊन परदेशात त्यांची पाठवणूक केली आहे. या प्रकरणात मास्टरमाईंड मनोज गुप्ता याला अटक झाली असून या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या सात इतकी आहे.

आरोपी बांगलादेशींकडून ५ ते १० हजार रुपये घ्यायचा आणि त्यांना आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवून द्यायचा. त्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत सामील करायचा. त्यानंतर खोट्या पत्त्याआधारे त्यांना पासपोर्टसाठी अर्ज करायचा. जेव्हा हे पासपोर्ट पोस्टाने यायचे तेव्हा पोस्ट ऑफीस कार्यालयातील माणसांना मॅनेज करुन ते मिळवायचा. आणि बांग्लादेशी नागरिकांकडून पाच लाख रुपये यासाठी आकारले जायचे असे सूत्रांनी सांगितले. मनोज गुप्ता याला प. बंगाल पोलिसांनी अटक करुन अलीपूर कोर्टात हजर केले आहे. कोर्टाने त्याला १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प. बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील गायघाटा पोलीस स्टेशन क्षेत्रातील चांदपाडा मोतीलाल गुप्ता रोड येथील कार्यालयातून आरोपी मनोज गुप्ता आपले रॅकेट चालवित होता.

SL/ML/SL

30 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *