समलिंगी जोडप्याला सोबत राहण्याचा अधिकार, आईवडिलांना हस्तक्षेप न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :समलिंगी जोडप्याला सोबत राहण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये आईवडिलांनी त्यात दखल देण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिला. एक तरुणी तिच्या ‘समलिंगी जोडीदारा’ सोबत राहत होती. मात्र आईवडिलांनी तिला जबरदस्ती करून घरी आणले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. दरम्यान, न्यायालयाने तरुणीच्या बाजूने निकाल देत तिला तिच्या ‘जोडीदारा’ सोबत राहण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला. न्यायमूर्ती आर. रघुनंदन राव आणि न्यायमूर्ती के. महेश्वर राव यांच्या खंठपीठाने हा निकाल दिला.
ML/ML/PGB 23 Dec 2024